एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकSouth Cinema Kantara 2 Actor Passes Away: 'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला, Inst Bio नं सर्वांचीच झोप उडवली
South Cinema Kantara 2 Actor Passes Away: 'कांतारा 2' फेम अभिनेता मित्राच्या घरी असतानाच अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. मित्राशी बोलता बोलताच अभिनेता अचानक कोसळला.
By : नामदेव जगताप|Updated at : 13 May 2025 08:18 AM (IST)
South Cinema Kantara 2 Actor Passes Away
Source :
ABP MajhaSouth Cinema Kantara 2 Actor Passes Away: रिषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा 2'ची (Kantara 2) सारेच आतुरतेनं वाट पाहत आहे. पण, 'कांतारा 2'च्या सेटवरुन वाईट बातम्यांचा ओघ काही दिवसांपासून वाढला आहे. अलिकडेच, 'कांतारा 2'च्या सेटवर एका ज्युनिअर अॅक्टरचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. अशातच आता या सिनेमाच्या अभिनेत्याबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता राकेश पुजाराचं निधन झाल्याती माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राकेश पुजारा या 33 वर्षांच्या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री अभिनेता राकेश पुजारा अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी तो त्याच्या मित्राच्या घरी होता. त्याच्या मित्राशी बोलत असतानाच, बोलता बोलताच तो अचानक बेशुद्ध पडला. यानंतर सर्वांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं.
सारेच हादरले...
राकेश पुजाराला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगण्यात आलं. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्व मित्र, सेलिब्रिटी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
View this post on Instagram
A post shared by Rakesh Poojary (@rakeshpoojary_comedy_kiladi)
इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेली धक्कादायक
अलिकडेच राकेशनं इंस्टाग्रामवर अनेक किस्से शेअर केले होते. एक फोटो मेहंदी समारंभाशी संबंधित होता. आणि दुसऱ्या फोटोद्वारे त्याने त्याच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, राकेश पुजाराचा इंस्टाग्रामवर बायो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. जिथे त्यानं लिहिलेलं की, 'माझ्यासाठीही आयुष्य खूप लहान आहे.'
राकेश 'कंतारा चॅप्टर 1' मध्ये झळकणार होता
ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटात राकेश झळकणार होता. त्यानं 11 मे रोजी चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं. आता त्याच्या अचानक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
Published at : 13 May 2025 08:18 AM (IST)
Tags :
ENTERTAINMENT BOLLYWOOD TOLLYWOOD Rishab Shetty Kantara 2 South Movie
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion